व्हायचे नव्हते होऊन गेले
अघटीत होते घडुन गेले
आस होती तुझ्या साथिची
पण... नियतीने निराळेच वळण घेतले
व्हायचे नव्हते होऊन गेले
अघटीत होते घडुन गेले
किती हवा हवासा वाटतो
तुझा क्षण भराचाही सहवास
जगावासा वाटतो मला
तुझ्याच सोबत माझा हर एक श्वास
पण सर्वच कुठे .आपल्या मनासारखे घडते
जे घडायचे तसेच घडते, नि घडून जाते
नि व्हायच्ये नसते तेच होते
अघटित असेच घडून जाते......
अघटित असेच घडून जाते
-निर्मला...........
