Author Topic: आज  (Read 733 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
आज
« on: August 17, 2014, 09:30:36 PM »
आज...
भाग्याचा दिवस
कुणाच्या सौभाग्याचा
कुणाच्या दुर्भाग्याचा...
कुणी प्रेमानं हसतंय
कुणी विरहानं रडतंय
कुणी कर्तव्यपुर्तीने
धन्य होत
आनंदाश्रू ढाळतंय...

आज...
भाग्याचा दिवस
तुझ्या लग्नाचा दिवस...!

हे सगळं
माझ्याही बाबतीत घडतंय
पण,
तुझी `पाणिग्रहणाची´ घटिका
तर
माझी `अंत्यसंस्काराची´ वेळ आहे!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता