Author Topic: तू.......  (Read 1031 times)

Offline shirke vinay

  • Jr. Member
  • **
  • Posts: 74
तू.......
« on: August 18, 2014, 03:06:39 AM »
तू....

खुप खुप सतावलस आता,
एकदातरी येउन जा...
व्यकुळलेल्या वेड्या मनाला,
थोड प्रेम तू देऊन जा....

नयनी तुझाच चेहरा राहिल अशी,
नजर तू भिडवून जा....
डबड्बलेल्या या डोळ्यांना,
गोड स्वप्ने तू देऊन जा.....

मनी तुझेच शब्द रहातील,
अशे गोड शब्द तु बोलून जा.......
भेटली होतीस पूर्वी जशी,
तशीच पुन्हा भेटून जा....

ओठी तुझच नाव राहिल,
इतक वेड तू करून जा...
हरवलेल्या या सुरान्ना,
साज नवा तू देऊन जा....
        विनय शिर्के 9967744137
« Last Edit: August 18, 2014, 03:11:30 AM by shirke vinay »

Marathi Kavita : मराठी कविता