खालील कविता ही नुसती कविताच नसून त्यात माझ्या स्वताच्या भावना दडलेल्या आहेत
दुखांच्या ह्या गर्दीतून
एक हाक मी देऊ का
आयुष्याला मागे सारून
बाबा मी तुमच्याकड़े येऊ का
भोवतालचे हे सुंदर जग
तुम्हीच मला दाखवले होते
हाती घेउनी माझे बोट
तुम्हीच मला चालवले होते
ते पावूल आज मी
तुमच्या दिशेला वलवु का
आयुष्याला मागे सारून
बाबा मी तुमच्याकड़े येऊ का
हसण्याचा प्रयत्न करतो मी
परी हसने काही जमत नहीं
तुम्ही गेल्याच्या वीरहा मुले
मन कुठेच रमत नाही
ह्या चंचल्शा मनाला आज
स्वातंत्र मी देऊ का
आयुष्याला मागे सारून
बाबा मी तुमच्या कड़े येऊ का
जरी आज सर्वत्र इथे
इंद्रधनू पसरला आहे
माझ्या जिवनातील रंग मात्र
फिकट पडत चालला आहे
ह्या बेरंगी जिवनामध्ला
शेवटचा श्वास मी घेऊ का
आयुष्याला मागे सारून
बाबा मी तुमच्याकडे येऊ का