Author Topic: काय केलस तु ?  (Read 1317 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
काय केलस तु ?
« on: August 20, 2014, 11:12:30 AM »
हळव नव्हत मन माझ
कमजोर का झाल  ?
विचार नव्हतो करीत कधी
मला कोड्यात का टाकलस ?
मुक्त नव्हत कधी मन माझ
मोकाट का बनवलस ?
आवडत नव्हत कल्पना करायला
मला स्वप्नाळु का बनवलस
निर्भिड नव्हत मन माझ
मला तु एवढ कठोर का बनवल
जगतांना नव्हत भान कसलच
आयुष्य अस बेभान का केलस
अंगात नव्हत बळ कधी
अचानक इतक बलवान का केलस
आवडत नव्हत जगण कधी
जगण्याच व्यसन का लावलस? :-* ::)

Marathi Kavita : मराठी कविता