Author Topic: शब्दहिन.  (Read 1162 times)

Offline Rahul 741

  • Newbie
  • *
  • Posts: 5
शब्दहिन.
« on: August 21, 2014, 06:49:11 PM »
तुझ्याशी आज खुप बोलाव वाटत होत,
पण सुचत काही नव्हत..
मनात खुप काही साचलेल होत,
पण तुझ्या कोणत्याच प्रश्नाच उत्तर सापडत नव्हत..
तु पाहिलेल स्वप्न मला आपल वाटत होत,
पण तुझ्या स्वप्नांन मध्ये फक्त माझच स्थान नव्हत..
सगळ्यांन साठी मी होतो,
पण खर तय या जगात माझ कोणीच नव्हत..
मला पण वाटायच आपल कोणीतरी असाव,फक्त
माझ्यासाठीच जगणार
माझ्या सोबत हसणार,माझ्या सोबत रडणार..
नात्यांचे बंध जोपासणार,शेवटपर्यंत नाते
टिकवणार..
मी नसल्यावर माझी आठवण काढणार..
पण कोणीच नाही अस मी मेल्यानंतर पण
माझ्यासाठी रडणार.......!

-स्वलिखित

Marathi Kavita : मराठी कविता