Author Topic: अक्षता  (Read 793 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
अक्षता
« on: August 22, 2014, 04:03:15 PM »
जेव्हा माझे झोपडे
अश्रूंच्या साक्षीने
मंदिराशेजारी बांधत होतो-
प्रत्येक काडीगणिक
तुझेच नाव घेत होतो
अन्
आकाशात विहार करणा-या
त्या जोडप्यातला चिमणा
माझ्याकडं बघून
फिदी फिदी हसत होता...
त्याच्यावर कुठं
असा प्रसंग आला होता-
आपल्याच प्रियेवर
अक्षता टाकण्याचा!!!!

*अनिल सा .राऊत *
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता