Author Topic: देवा........  (Read 1153 times)

Offline kuldeep p

  • Jr. Member
  • **
  • Posts: 164
  • Gender: Male
  • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
देवा........
« on: August 22, 2014, 07:46:39 PM »
देवा.......
आपण कोणावर प्रेम करावे
पण त्याने आपल्यावर करू नये
देवा...... असे का असते?

जाता येता प्रेमी युगूलांना बघायचे
पण आपण असे नाही करायचे
देवा...... असे का असते?

जळी स्थळी काष्टी पताळी तिच दिसते
पण तिला मात्र मी दिसू नये
देवा...... असे का असते?

तिच्या दर्शनाने दिवसाचे सोने होते
पण आपल्याला बघताच तिने नाक मूरडावे
देवा...... असे का असते?

तिच्यासाठी  रोज वाट बघतो
पण तिच्याबरोबर कोणीतरी दूसरेच जाते
देवा...... असे का असते?

ह्रदय तर प्रत्येकालाच देतोस
ह्रदयात जो असतो तो नशीबात नसतो
देवा...... असे का असते?


जोडी तर तुच बनवतोस
मग दुसर्याला का भेटवतोस
देवा...... असे का करतोस?

हे प्रेम आहे प्रेम
तुलाही समझते तरीही
देवा...... असे का करतोस?

Marathi Kavita : मराठी कविता