Author Topic: तू ये….  (Read 1420 times)

Offline ShwetaPimprikar

  • Newbie
  • *
  • Posts: 3
तू ये….
« on: August 23, 2014, 03:17:29 AM »
आज जिथे असशील तिथून ये….
आणि पार्किंग मध्ये माझी वाट बघत थाम्ब.
तुझ्या हातात माझ्यासाठी छान फुलं असू देत….
तुझ्या चेहऱ्यावर तेच भाव असू देत, जे त्यादिवशी होते, सिड इन्फोटेक च्या बाहेर माझी वाट बघताना …

मला काही विचारू नकोस…. फक्त जवळ रहा.
आणि मला सांग कि, तू मला खूप miss केल,
मला सांग कि आयुष्य does not make any sense without me.

मला सांग कि तुला ती प्रत्येक गोष्ट आठवते …जी मी तुझ्यासाठी केली .
मिही तुला सांगीन कि, तू केलेल्या सगळ्या गोष्टी मला अजूनही किती आठवतात..
तू आणलेल्या Dairy Milks, नेहेमि दोन ... black forest ची pastry… आणि माझ्या साठी borrow केलेल्या bikes आणि long rides…

नंतर मला विचार कि मी खूष आहे का? मी तुला त्याचे उत्तर "हो"च  देईन .
मग मला विचार कि मिए तुला miss केलं का?… मी तुला त्याचे उत्तर देणार नाही!

मला sorry म्हण त्या प्रत्येक कारणासाठी ज्यामुळे आपण आज एकत्र नाही आहोत.
माझा हात धर आणि माझ्या डोळ्यात आलेले पाणी बघत रहा ….

मग आपण दोघेही शांत होऊ. …आपल्याल जाणीव होईल की ते सगळं आता संपलय. मी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न केलंय आणि
तू अजूनही माझं प्रेम शोधतोयेस , दुसऱ्या कोणामध्ये तरी ……
« Last Edit: August 23, 2014, 09:35:04 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Rajkanishka Waghmare

  • Guest
Re: तू ये….
« Reply #1 on: August 26, 2014, 01:54:53 PM »
फार छान....