Author Topic: मेलेल्या वाटेला  (Read 1018 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
मेलेल्या वाटेला
« on: September 01, 2014, 06:48:07 PM »

आज मेलेल्या वाटेला
थोडे जावुनिया आलो
चार पावुले विषारी
जरा चालुनिया आलो

रक्त शिंपले तरीही
नच उगवले काही
न ये डोळ्यामध्ये पाणी
खाचा करुनिया आलो

प्राण जपावे कशाला
अर्थ नसे जगण्याला
उगा कुठेतरी पण
जीव टांगुनिया आलो 

माझा उसवला श्वास
ठोके मोजतो अजून
लाल धमन्यात मीच 
मृत्यू टोचुनिया आलो

विक्रांत प्रभाकर


« Last Edit: September 04, 2014, 02:16:39 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता