आयुष्याच्या ह्या वळणावरती
वाट चुकतेय आज पुन्हा
कसले दडपण ह्या मनावरती
काहीतरी चुकून घडतोय गुन्हा
तुझ्या आठवणींचा पाऊस
अजुनही संपला नाही...
श्रावणाचे असती चार महिने
तरसुन बरसून निघुन तो जातो
पण तुझा पाऊस तसाच
अजुनही थांबला नाही...
थेंब न थेंब एक एक आठवण
अधुनमधून सरींसारखी
मनी ओलावा देऊन जाते
भिजवुन जाते पुन्हा पुन्हा.....
निघुन तर गेली तु सुखरुप
मन हे तिथेच राहुन गेले
प्रवास तर केला मी पुढे पुढे...
शरीराने अन् वयाने...
मन मात्र तिथेच थांबुन गेले...
तुच म्हटले होतेस ना
जिवन कधिही थांबत नाही
वचनही माझ्याचकडून घेतले होतेस तु
कि चालत राहशील ह्या वाटेवर
आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती
वळण देशील तुझ्या मना...
मलाही वाटतयं ...आता चालावं
पुन्हा एकदा जीवन बहरावं
पण भितीही तुझ्याचमुळे ह्या मनाला
कि उभरुन येईल घाव जुना...पुन्हा...
वाटे नको ते क्षितिज
नको ती भुरळ...
किती छेडिले आजवर स्वत:ला
मीच मारीले माझ्या मनाला...
तुझ्या क्रुपेमुळे...
अन् तु ... तुला तर काही
माहीतही नसेल...
इथे सतत वणवा पेटला
तुला तर त्याची जाणही नसेल...
पण आजवर जे झाले
ते खुप जाहले..
आज पुन्हा मन जागं होतयं...
कुणासाठीतरी....
पहिल्यांदा तुला विसरुन...
अंकुर फुटतोय ह्या मनाला
तुझ्या नावाचं झाड पडुन...
जे सोसलं आजवर
ते विसरायचं मला...
मनाला सोबत घेऊन
चालायचं एका नव्या वाटेला....
बेधुंद आज पुन्हा हे मन
होतयं कुणासाठीतरी...
ना अडवायचं आता त्याला...
जगवायचं मला माझ्या मनाला...
आज पुन्हा.... आज पुन्हा...
--- सतिश चौधरी