Author Topic: ती असायला हवी होती....  (Read 1307 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
ती असायला हवी होती....
« on: September 04, 2014, 08:07:17 AM »
असायला हवी होती ती आज
स्वप्न तिचे साकारलेले पहायला
.
.
.
तिच्याशिवाय नाही जगू शकलो मी
तिलाच पडलेले स्वप्न
सत्यात उतरलेले पहायला
.
.
.
तिरडीवरल्या कफनातून मी
अन्
भरजरी शालू नेसून ती
निघालो दोस्तांनो,
पुन्हा नवी स्वप्नं सजवायला!
             -अनिल सा.राऊत
           9890884228
« Last Edit: September 08, 2014, 07:06:13 AM by Anil S.Raut »

Marathi Kavita : मराठी कविता


महेश फत्तरफोडे

  • Guest
Re: ती आज येऊन गेली...
« Reply #1 on: September 07, 2014, 02:26:28 PM »
निशब्द तूझ्या श्वासातल्या
गहीऱ्या भावना दाटलेल्या
लांब जाताना तूझ्यासवे सखे
अश्रू तूझे मी ओळखुन आहे

ईतके प्रेम आजवर दिलेस तू
माझ्याही नकळत मला
नयनांचा व्याकुळ बांध तूझा
आजही मला ठाऊक आहे

झुरतो प्रत्येकक्षणी मनकवडा मी 
सखे फक्त तूझ्याच साठी
विरहातही तूझ्या अश्रूंना शपथ
माझ्याच ऊत्कट भेटीची 

अपुर्ण असतिल जरी शब्द माझे
भावना माझ्या साक्ष आहेत.....!
काळजातल्या आठवांचे तरंग तूझे,
माझ्याभोवती आजही दाटले आहेत.........,

कवी - महेश फत्तरफोडे.