Author Topic: अपेक्षांची प्रेत  (Read 914 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
अपेक्षांची प्रेत
« on: September 08, 2014, 10:37:06 PM »
अपेक्षांची प्रेत
तरंगू लागतात
निराशेच्या डोहात
निरर्थक
ओशाळलेले मन
शब्दावाचून   
घेते पुरून
स्वत:लाच
आणखी एक प्रहार
घेवून छातीवर
अस्तित्वाचा स्वर
कोमेजतो
हे ही जगणं
घ्यावे स्वीकारून
तुडवावे रान 
जिंदगीचे

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: October 19, 2014, 02:48:09 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता