Author Topic: तुझ्याविना........  (Read 1431 times)

Offline kavita.sudar15

  • Newbie
  • *
  • Posts: 28
तुझ्याविना........
« on: September 10, 2014, 12:47:07 PM »
मंद मंद करी धुंध धुंध वारा हा आज मज,
   कुठे गुंतलास रे वेड्या आठवण येत नाही का माझी तुज..........
क्षण तुझ्या माझ्या प्रेमाचे टिपले नयनी आज,
    का एकटाच शांत आहेस वेड्या का कळेना काही तुज............
भांडण रुसवे क्षणाचे सारे, तुझ्या विचारात गुंतले मी आज,
     रागावतो किती रे वेड्या, समजत का नाही? मनातील गुपित तुज.............
प्रेमात असते क्षम्य सारे, मग तुझाच का पारा चढावा,
     अरे छोट्या छोट्या भांडणाने तर वेड्या प्रेमातील गोडवा वाढावा..............
तुझे माझे इवलूसे जग, सामावते तुझ्या अन माझ्या अंतरी,
    तुझ्या रुस्व्याने सारे काही व्यर्थ वाटे मज, तुलाही वाटू दे काहीतरी.............
तुझ्यासवे असताना तुझ्याविना जगायचे रे कसे?
   अंतरात राहून अंतर कसे?..............
सोड हा अबोला प्रिया, तुझ्याविना सारे अपूर्ण जसे,
     एकटाच राहून तुज माझ्याविना मन लागते कसे?............
तुझ्याविना नकोसे काही मला,
     बहाणे करतोस किती, जरी सारे कळते तुला................
तुझ्यासवे जगताना अनोळखी समजू कसे?,
   नाते कोणते जपू अन कसे, हसता हसता आसू टिपणे.............
वाटेवर तुझ्या माझे डोळे लागले,
   काय अन किती सांगू तुला, सांग ना रे वेड्या तुला सारे कळले................!!!!! @ कविता @
     

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
Re: तुझ्याविना........
« Reply #1 on: September 10, 2014, 04:34:43 PM »
छान ..