Author Topic: सखे आज तू हवी होतीस  (Read 1061 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
सखे आज तू हवी होतीस
« on: September 11, 2014, 10:13:06 AM »
सखे आज तू हवी होतीस
माझ्यासोबत
मनसोक्त पावसात भिजायला
या चिंब पावसाच्या साथीने
प्रेमगीत गायला

राहून राहून वाटत होत
यावं तुझ्यापाशी
तुला सोबतीला घेवून
बेधुंद होवून खेळावं
या पावसाच्या थेंबाशी
सखे आज तू हवी होतीस

वाटत होत मनाला
तुलाही समजत असतील
भावना या पावसाच्या
रमवत असशील तुही
आठवणीत स्वताला
सखे आज तू हवी होतीस

तुझ्या त्या आठवणीचा
मनात कल्लोळ उठतो
हा पाऊसही मग
नीरस वाटू लागतो
म्हणून म्हणतो सखे
आज तू हवी होतीस

प्रविण रघुनाथ काळे
८३०८७९३००७

Marathi Kavita : मराठी कविता