Author Topic: रात  (Read 844 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
रात
« on: September 11, 2014, 03:25:18 PM »
सांज सरता सरता , रात दारात यावी
अशा वेळेला साजणा,तुझी आठवण व्हावी !

ये ना मजपाशी,बस असा बिलगुनी
प्रेमात तुझ्या मी, चिंब भिजुनिया जावी !

किती छळते रात, काटे टोचतो बिछाना
आसवांनी माझ्या रे, तुझी उशी भिजावी !

वाट पाहून पाहून,थकली रे ही वाट
कोरडीच का आजही,  रात सरून जावी ?


*अनिल सा.राऊत *
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता