Author Topic: तुझ्या विरहात जळताना....  (Read 1111 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
तुझ्या विरहात जळताना....
« on: September 11, 2014, 07:24:39 PM »
अचानक असे शब्द ओठावर येता
होऊन जाते एक कविता
तुझ्या विरहात जळताना ....

आभाळ फाटल्यागत ह्रदय पाझरते
पण सर्व काही कोरडेच असते
शब्दच इथे अबोल होतात
तुझ्या विरहात जळताना ....

मनातील खळबळ कशी सांगू ?
ओठच मुके तिथे काय मागू ?
नयनांची आर्जवे गाफील अश्रूंना
तुझ्या विरहात जळताना ....

त्या भेटीचा मोगरा असा फुलला
सुगंध ह्रदयी परि का डसला ?
घायाळ मी असा विनाजखमांचा
तुझ्या विरहात जळताना ....

अचानक अशी तुझी आठवण येता
अश्रूत भिजून अर्धीच रहाते कविता
तुझ्या विरहात जळताना ...!
तुझ्या विरहात जळताना ....!!


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता