Author Topic: आठवणींचा काहूर उठला ..........  (Read 1013 times)

Offline dipakmuthe

  • Newbie
  • *
  • Posts: 7
आठवणींचा काहूर उठला ..........
« on: September 12, 2014, 03:30:24 PM »

आठवणींचा काहूर उठला
सहनशिलतेचा बांध हि फुटला
सहवासातील क्षणांचा पाझर
अंतर्मनात दाटला ….
आठवणींचा काहूर उठला …
डोळ्यांच्या पापण्यांवरती
अश्रूंचा सागर दाटला …
कणखर माझ्या मनामध्ये
अलगद पणे आज हुंदका फुटला
आठवणींचा काहूर उठला …।
क्षणभंगुर या आयुष्यातील
काळ सुखाचा लोटला…
आयुष्याच्या पानामध्ये ।
शब्द तुझा भेटला……
आठवणींचा काहूर उठला……
@दिप
« Last Edit: September 14, 2014, 05:38:16 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता