Author Topic: आज पुन्हा डोळे भरून आले....  (Read 1605 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
आज पुन्हा डोळे भरून आले....
« on: September 27, 2014, 07:20:56 PM »
आज पुन्हा डोळे भरून आले
अन क्षितीज सूर्यावरचे उतरून गेले....
मावळतीच्या आठवणी सा-या
गालावरती सांडून गेले ..........
गुन्हा इतकाच मनाचा
पुन्हा पुन्हा तुला आठवत गेलो
विसर पडला सा-यांचा
पण तुला मात्र लक्षात ठेवत गेलो......
का कुणास ठाऊक भीती वाटते
तुला विसरण्याची ..
तुला विसरलो तर उरले काय
पुसला जाईल तुझा चेहरा
म्हणून हल्ली भीती आहे रडण्याची ...
आभास आहेत सारे तुझे माझ्याभोवती
पाखरे पोरकी जणू रानावरती
पाउसही उदास अन त्याला गारा सोबती
पाने झाडावरली फेर धरणारी वा-यावरती...
स्पर्श अजूनही तसाच आहे तुझा
माझ्या हातावर ...
अजूनही तसेच आहे स्वप्न आपण पाहिलेले
प्रेम तरी देऊन जा जरासे
जे तुझ्याजवळ आहे राहिलेले ........
                                                     -----Er Shailesh Shael

Marathi Kavita : मराठी कविता