Author Topic: मनातले प्रेम  (Read 1367 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
मनातले प्रेम
« on: October 05, 2014, 10:36:58 AM »
मनातले प्रेम अजुनही तसे ताजेच आहे
जखमातील रक्तही अजून ओलेच आहे !

विश्वासानेच इथे विश्वास तोडला आज तिने
चुरगाळले जरी गुलाब,सुगंध बाकीच आहे !

कवटाळले आधी छातीशी,तिनेच तुडविले पायी
धडधड ह्रदयाची तिच्याचसाठी शिल्लक आहे !

वर्षाव करुनि प्रेमाचा,सोडून हात ती गेली
स्पर्शातली जादू तिच्या,अजूनही तशीच आहे !

पुसलेत ओठ आज तिने स्वतःच स्वतःचे
गालावरची खुण माझ्या,कायम कोरलेली आहे !

लाभो शरीर माझे,झोंबण्यास कुणालाही आज
देहातला जीव माझ्या,तिच्याकडेच गहाण आहे !


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता

मनातले प्रेम
« on: October 05, 2014, 10:36:58 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):