Author Topic: किती काळजात तिचीच तस्वीर आहे  (Read 1045 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
**किती काळजात तिचीच तस्वीर आहे**

प्रेमात जिंकलाय असा कोण वीर आहे?
विरहानेच रेखलेली माझी तकदीर आहे !

होती जवळ तोपर्यंतच सिकंदर मी होतो
प्रेमात आता मी झालो फकीर आहे !

होती तेव्हा माझीच ती सावली होती
ह्रदयावर आज तिच्या कोण स्वार आहे ?

दडपून झडपा केल्या बंद मी वेदना
आठवणींचा माञ त्यास नकार आहे !

सांभाळता नाही आली रे रीत जगाची
स्वार्थ ना पाहिला,ही माझीच हार आहे !

कळले नाही कधीच कुणाला वेडात
किती काळजात तिचीच तस्वीर आहे ?


*अनिल सा.राऊत*
9890884228