Author Topic: डस्टबिनचे माझे प्राक्तन  (Read 438 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
मनातील आशा मेली की
जगणे फार सोपे असते
कारण आता तुम्हाला
कसलीच भीती नसते
जशी भिकाऱ्याला
चोरीची भीती नसते
अथवा वेश्येला
अब्रूची भीती नसते
थोडक्यात घालवण्यासारखे
काही राहिलेले नसते
अन मिळविण्यासारखे
काही उरलेले नसते
तुझ्या प्रेमाबाबतही
मला असेच काही
होवून गेले आहे
ओल्या टिश्यूपेपरगत
जगणे झाले आहे
डस्टबिनचे माझे प्राक्तन
मी स्वीकारले आहे

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: October 10, 2014, 09:26:47 AM by MK ADMIN »