Author Topic: आज परत जेवा तुला पाहिले  (Read 1162 times)

Offline shaan@5

  • Newbie
  • *
  • Posts: 9
आज परत जेवा तुला पाहिले
« on: October 08, 2014, 11:47:52 PM »
पाहताक्षणी तुला रोमांच ऊभे ठाकले
पुसटशी झाली दिशा
ऱ्हदयाचे ठोके चुकले
आज परत जेवा तुला पाहिले

आठवणीतले ते क्षण तरळले
परत एकदा जीवंत करून गेले
नजर थिजली, मन बिथरले
आज परत जेवा तुला पाहिले

आसवांसह नभ कोसळू लागले
वाराही भिजला अन मनही
पक्षीही गाणे गाउ लागले
आज परत जेवा तुला पाहिले

एका क्षणात मन वेडे झाले
क्षणाचा मोह हा, वेडे तू विसरली
मीही विसरलो, पण मन नाही विसरले
आज परत जेवा तुला पाहिल

Marathi Kavita : मराठी कविता