Author Topic: तुझ्या मनातल्या मंदिरात....  (Read 1002 times)

Offline Kaustubh P. Wadate.

  • Newbie
  • *
  • Posts: 12
तुझ्या मनातल्या मंदिरात देवच नाही
मग कोणाला मी पुजायचं?
तुझ्या मनातल्या पक्ष्याला पंखच नाही
मग कसं मी उडायचं?
तुझ्या प्रेमाच्या सागरात पाणीच नाही
मग कसं मी पोहायच?
तुझ्या प्रेमाच्या भाषेत शब्दच नाही
मग कसं तुझ्यावर प्रेम करायचं?

-कौस्तुभ प्रकाश वाडते