Author Topic: रक्ताळलेल्या जखमेने...  (Read 933 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
रक्ताळलेल्या जखमेने...
« on: October 15, 2014, 08:01:40 PM »
रक्ताळलेल्या जखमेने आज मी तुझ्यावर एक पुस्तक लिहिले,
मनातील अबोल भावनेला अलगद लेखणीतून कागदावर उतरवले...

मिटून पापण्या आठवून तुला मी लिहायास सुरुवात केले,
धुदंलेली लेखणी अन् शब्दाच्या सुमनात पार वाहून गेले...

रक्ताळलेल्या जखमेने आज मी तुझ्यावर एक पुस्तक लिहिले,
मनातील अबोल भावनेला अलगद लेखणीतून कागदावर उतरवले.

भेट ती आपुली होती जरा वसंतापरी बहरलेली
निरखुन बघता तुझे मला मी जरा बहरुन गेली.

रक्ताळलेल्या जखमेने आज मी तुझ्यावर एक पुस्तक लिहिले,
मनातील अबोल भावनेला अलगद लेखणीतून कागदावर उतरवले..

तुझ्या त्या कटाक्ष नजरेने हद्यावर नकळत वार केले,
अन् कळलेच नाही मला कधी कसे हे मन माझे तुझे झाले..

रक्ताळलेल्या जखमेने आज मी तुझ्यावर एक पुस्तक लिहिले,
मनातील अबोल भावनेला अलगद लेखणीतून कागदावर उतरवले..

आता स्वप्नातही का मला  होवू लागले वेडे भास तुझे,
आतुर आतुर मनास तुझ्या भेटीची आस लागे..

रक्ताळलेल्या जखमेने आज मी तुझ्यावर एक पुस्तक लिहिले,
मनातील अबोल भावनेला अलगद लेखणीतून कागदावर उतरवले...

हरवून भान आज माझे मिठीत मी तुझ्या धुदं झाले,
मिठीत तुझ्या येताच मन माझे रंगाने रंगून गेले...
Speacial Thanks:-

स्वप्नील

Marathi Kavita : मराठी कविता