Author Topic: मला कधीच डेअरिंग नव्हते  (Read 1101 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
मला कधीच डेअरिंग नव्हते
« on: October 22, 2014, 07:42:00 PM »
मला कधीच
डेअरिंग नव्हते
तिला विचारायचे
तिला कधीच
डेअरिंग नव्हते
माझे व्हायचे

माझे होणे
तसा व्यवहार
होता तोट्याचा
शुद्ध सुवर्ण
कर्णफुलापुढे
व्यर्थ फुलोरा
क्षणिक फुलांचा
 
बाजार पाहिलेली
ती आता
फसणार नव्हती
एकदा चुकलेली
ती आता
ठकणार नव्हती

काही गोष्टी
आयुष्यात किती
उशिरा भेटतात
उन्मळलेल्या
वृक्षावरही कधी
मोहर फुलतात

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: November 12, 2014, 10:47:30 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता