Author Topic: तो काय करुन गेलाय त्याला कळणार नाही कदाचित  (Read 1176 times)

Offline सुमित

  • Newbie
  • *
  • Posts: 25
तो काय करुन गेलाय हे त्याला
कळणार नाही, कदाचित...

खूप खूप भिजले त्याच्यात, चिंब चिंब न्हाले
आनंद काय हे तेंव्हा कळले
त्याच्यामुळेच, कदाचित...

रात्र रात्र जागले आठवणीत, स्वप्नातही शहारले
स्पर्श काय हे तेंव्हा कळले
त्याच्यामुळेच, कदाचित...

बंध तोडले त्याने एका क्षणात, डोळेही डबडबले
विरह वेदना काय हे तेंव्हा कळले
त्याच्यामुळेच, कदाचित...

तो काय करुन गेलाय हे त्याला कळणार नाही, कदाचित...
जगूच नये कुणासाठी, मृत्यूला कवटाळाव का
हल्ली सारखं वाटत
त्याच्यामुळेच, कदाचित...

सुमित 9867686957