Author Topic: समजून बसलो  (Read 1484 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
समजून बसलो
« on: October 27, 2014, 08:13:39 AM »
दगडात भावना नसतानाही
त्याला देव समजून बसलो !
स्मशानात नव्हते काही
तेथे भूत समजून बसलो !
दारी आले जनावर
त्याच्यात सॄष्टी समजून बसलो !
कान फुंकुणी मारी मंतर
त्याला डॉक्टर समजून बसलो !
केस सोडून झूले बाई
तिला देवी समजून बसलो !
देव कोपेल माझ्यावर मनुण
बाभनाच्या हातून पूजा शांती करून बसलो !
होते नव्हते सारे काही
त्याच्या चरणी ठेऊन बसलो !
होते सारे काही तरीही
देवार्यात आणखी मागित बसलो !
या अंधश्रध्दा मुळे असे मी फसलो
जातीची गाडी सोडून दुसऱ्याच गाडीत बसलो !

संजय बनसोडे 9819444028

Marathi Kavita : मराठी कविता


मैथिली

  • Guest
Re: समजून बसलो
« Reply #1 on: November 02, 2014, 11:18:28 PM »
देव कोपेल माझ्यावर मनुण
बाभनाच्या हातून पूजा शांती करून बसलो !

------------------------------------

देव कोपला माझ्यावर मनुण

माझे सुद्लेकन फार वाईट आहे.