Author Topic: साद ......  (Read 1044 times)

Offline Surya27

  • Newbie
  • *
  • Posts: 18
साद ......
« on: October 28, 2014, 01:05:08 AM »
तू म्हणजे माझ सर्वस्व
तू म्हणजे माझ अस्तित्व
तू म्हणजे माझी सावली
तुझी आठवण पावलो पावली

तुझ्या जाण्यान निर्माण झाली 
कधीही न भरून येणारी पोकळी
हिरमुसलेल झाड अन सुकलेली पान
उमललेल फूल पण कोमेजलेली पाकळी

तुझ्या विरहात वाहतात अश्रू
जड झाले शब्द अन मुके झाले मन
अंतरीच्या जखमा न दिसती जरी
वेदनेने विव्ह्ळते व्याकूळ हे मन

काहीच न उरले आता या जीवनी
तुज विन आता झाले जग हे सुने
जुळता जुळता झाला हा दुरावा 
विरहात जळती तुटलेली ही मने 

पुन्हा कधीतरी फुलून येईल बहर
आसमंत दरवळेल प्रीतीचा सुगंध 
या प्रतीक्षेत मी सदैव तत्पर
विणतो स्वप्न जाळे मनोबंध 

सोड ना आता हा अबोला
तू ये परत माझ्या घरा
पुन्हा घाल बाहूंचा विळखा
साद दे ना मज पाखरा
....................... सूर्या

Marathi Kavita : मराठी कविता