Author Topic: कवितेत रस नाही  (Read 837 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
कवितेत रस नाही
« on: October 30, 2014, 02:12:39 PM »
मधपोळीत मध नाही
दान्यात कस नाही
ओसाड झाले मन
कवितेत रस नाही !

पारावर जोक नाही
गावात लोक नाही
अस्वस्थ मनास
रात्रभर झोप नाही !

जंगलात वाघ नाही
रानात साग नाही
ना उरले कुणी जिवलग
जीवास कुणाचा धाक नाही !

पाटात पाणी नाही
मैफलीत गाणी नाही
मंदिरे पडली ओसाड
तेथे संतांची वाणी नाही !

लेकराला आई नाही
शाळेत आता बाई नाही
मोडून पडला पेन
पेनात आता शाई नाही !
 
संजय बनसोडे 9819444028

Marathi Kavita : मराठी कविता

कवितेत रस नाही
« on: October 30, 2014, 02:12:39 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):