Author Topic: ओल्या जखमा  (Read 1000 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
ओल्या जखमा
« on: November 06, 2014, 10:11:27 PM »
बंद मुठीत या भविष्य घेऊन जन्मलो
आता सैल आहेत मुठी
पण..
हातात काहीच नाही
भविष्यही गेलेय उडुन-
कापराप्रमाणे!
जगण्याला प्राप्त झाला वर्तमान
पण...
चाचपडत राहिलो भुतकाळातच-
वेडपटासारखे !
माहित आहे तिच्याशिवाय
अर्थ नाही जगण्याला
पण...
तसाच जगत राहिलो-
अश्वस्थाम्याप्रमाणे!
फरक फक्त इतकाच
त्याच्या जखमा त्याला
भविष्याची जाणिव करुन देत होत्या
तर,
भविष्यातील स्वप्ने दाखवुन
तीच भुतकाळ बनली
अन्
वर्तमानाला शस्ञ बनवुन
तिनेच दिलेल्या
माझ्या जखमा
अजुनही ओल्या आहेत!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता

ओल्या जखमा
« on: November 06, 2014, 10:11:27 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):