Author Topic: तु दीलेला धोका मी कधीच विसरणार नाही  (Read 1880 times)

Offline Shraddha R. Chandangir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 346
 • Gender: Female
विरहाची ही आग मनात सहज विजवणार नाही
तु दीलेला धोका, मी कधीच विसरणार नाही.

जान, जानु म्हणून
तुझे सगळे लाड पुरवले
पण प्रेमाला माझ्या
तु हसत हसत लाथाडले.

डोळ्यातले अश्रु सुकले, तरी मनातली ओल पुसणार नाही
तु दीलेला धोका मी कधीच विसरणार नाही.

आयुष्यभरचा साथी म्हणून
मला चारचौघात मीरवले
मंदीरात दीलेले लग्नाचे वचन
कधीच कुठेतरी हरवले.

माझ्या मनाशी खेळल्याचा जाब तुला विचारणार नाही
तु दीलेला धोका मी कधीच विसरणार नाही.

जीवाशी माझ्या खेळून
तु काय मीळवले?
तुला गमवता गमवता
मी नकळत स्वतःला गमवले.

शपथ खाऊन सांगतो, तुला परत आठवणार नाही
पण तु दीलेला धोका मी कधीच विसरणार नाही.

- अनामिका

LIKE MY FB PAGE!!

https://www.facebook.com/pages/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/1500709300183536?hc_location=timeline
« Last Edit: November 12, 2014, 11:28:55 AM by @Anamika »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
खूपच छान....अनामिका


Offline सतिश

 • Jr. Member
 • **
 • Posts: 127
 • Gender: Male
तुमची लिखाणाची शैली खास आहे..
आणि हो.. कुणीतरी अगदी बरोबर म्हटलेय..
" अतीव दुखा:तूनच महाकाव्याची निर्मिती होते  :)

Offline सतिश

 • Jr. Member
 • **
 • Posts: 127
 • Gender: Male
Shevati smiley takale hote.. disat nahiye te..

Offline Shraddha R. Chandangir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 346
 • Gender: Female
hahahahaha :) smiley diso n diso....  tumchya manatlya bhavna matra pohochalya....  :) aani dukh vegre kahi nahi...  hi kalpnik kavita aahe...... :)