Author Topic: वेडी आई....  (Read 901 times)

Offline shirke vinay

  • Jr. Member
  • **
  • Posts: 74
वेडी आई....
« on: November 11, 2014, 11:52:32 PM »
वेडी आई...
मुलगी गमावलेली आई अंगणात,
डोक्याला हात लावून बसली आहे ....
दूरवर वाटेकडे डोळे लावून,
अशी तर म्हणत नसेल ना...
दिवा लावून घरात ,
तु निघून का गं गेलीस ....
बघं संध्याकाळ झाली ,
अजुन... का ग घरी न आलीस ....
रागावलीस का माझ्यावर ,
नाही सांगणार मी काम.
अगं ही लोक वेडी म्हणतात मला....
का गेलीस तू इतकी लांब ?
तुझ्या जाण्याने माझ्या,
जगण्यास काहीचं अर्थ नाही राहिला ...
                            सविता ताजणे..

Marathi Kavita : मराठी कविता