Author Topic: पुन्हा पुन्हा...  (Read 1165 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,270
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
पुन्हा पुन्हा...
« on: November 13, 2014, 10:31:31 PM »


पुन्हा पुन्हा...

जीवन देणाऱ्या सुर्याला
पाहीले परत मावळतांना।

पाहीलय पुर्ण चंद्राला
फिरून पुन्हा झाकोळतांना।

दिसले उधान लाटांचे
पुन्हा एकदा ओसरतांना।

पचविले विष विरहाचे
पेला रीता करतांना।

पाहीले स्वप्नांना साऱ्या 
पुन्हा पुन्हा विखुरतांना।

©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता