Author Topic: सारे अंग दगड झाले  (Read 814 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
सारे अंग दगड झाले
« on: November 14, 2014, 09:19:14 AM »
तिचे दोन शब्द,मला असे टोचले
जसे कूसळ गवताचे,अंगी रुतले !

शब्दाची कुल्हाड़ी,मारून ह्रुदयाला
घाव तिने असा केला !
रक्ताचा पाझर फुटूनी
डोळ्यातुनी वाहू लागला !

तिच्या शब्दाचा काटा,असा टोचला
अंगातील रक्त बाहेर सांडले !
का केल प्रेम वेड्या
मन माझ मला भांडले !

तिच्या प्रेमा अभावी मी
लखव्या सारखा झालो !
बोलवेल जिथे,तिथे मी
चकव्या सारखा गेलो !

तिच्या दोनच शब्दाने
मन हे अवजड झाले
होतो स्तब्ध उभा मी
सारे अंग दगड झाले !

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता