Author Topic: प्रेम फक्त देहाचे ??  (Read 1043 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
प्रेम फक्त देहाचे ??
« on: November 22, 2014, 11:34:43 PM »
जर माझ्या ओठातून
तुझे गीत येवू लागले
तर शिवून टाक त्यांना
चांभाराच्या दाभणीने
चामड्याच्या वादीने
जर माझ्या डोळ्यातून
तुझे प्रेम पाझरू लागले
तर खाचा कर त्यांच्या
काट्यांनी टोचून
दे अंधारात लोटून
अन हात लिहू लागले
शब्द तुजवरती पुन्हा
ठेचून टाक त्यांना
निर्दयपणे दगडांने
कलम कर वा
धारधार शस्त्राने
पण मला माहित आहे
एवढे सारे करूनही
प्रतिमा तुझी या मनातील
तू कधीच नष्ट
करू शकणार नाहीस
माझे अंध डोळेही
तुलाच पाहत  राहतील
अन शिवलेल्या ओठातून
तुझेच नाव उमटत राहील
माझ्या देहाच्या कंपणात
तुझेच स्पंदन राहील
अन ठेचाळलेली बोटे
तुझेच चित्र रेखाटतील
प्रेम फक्त देहाचे
देहावरच असते
समज तुझे
सारेच खोटे ठरतील

विक्रांत प्रभाकर


« Last Edit: November 23, 2014, 10:19:51 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता