Author Topic: मी अन् चंद्र  (Read 687 times)

Offline गणेश म. तायडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 195
  • Gender: Male
  • ॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥
    • ganesh.tayade
मी अन् चंद्र
« on: November 23, 2014, 11:32:42 AM »
एका चंद्र रात्री मी माळीवर बसून होतो
त्या रात्री फक्त मी अन् चंद्र सोबत होतो,
त्या चंद्राला पाहून तुझ्या अबोल प्रितीची आठवण झाली
अन् आठवणीने माझ्या मनाची रडापड झाली,
अगं माझ्यावर तु कधीच नाराज नको होऊ
अन् माझ्यापासून तु कधी दूर नको जाऊ,
तुझे हसणे, तुझे रडणेे मला खूप आठवतात
तर "चल जा रे" असे शब्द मला फार हसवतात,
तुझ्या प्रेमाने मला उपदिशा जगण्याची दिली
अन् नाराज होऊन मला तु सोडूनी गेली,
नेहमीच आठवणार आहे मी तुला
अन् नेहमी आठवणार आहे तु मला,
तुझी आठवण नेहमी सतवणार आहे मला
अन् जिवनाच्या प्रत्येक क्षणाला दिसणार मी तुला...

- गणेश म. तायडे
   खामगांव

Marathi Kavita : मराठी कविता