Author Topic: या माझ्या प्रेमा आता हाड कर  (Read 666 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
जमलेच तर
एक काम कर
या माझ्या प्रेमा
आता हाड कर

खुळचट सारे
शोध सुखाचे
व्याकूळ भुकेल्या
या पथ कुत्र्याचे

सवय जुनाट 
आहे वेड्याची
स्नेह सुखाची 
नि सहवासाची

उगाच भावूक
बघ होवू नको   
खावू बोलावून
तया देवू नको

थोडा कुई कुई
करेल तसा तो
तोंड खुपसून
रडेल उगा तो

प्रत्येक श्वानास 
जगणे असते
कधी तूप रोटी
कधी उकिरडे

विक्रांत प्रभाकर

« Last Edit: November 23, 2014, 10:19:42 PM by MK ADMIN »