माझ्या एका स्वप्नाला जपण्यासाठी
तुझ्या सहवासाची जोड हवी
मनातील भावना सावरण्यासाठी
तुझी ती प्रेमळ साथ हवी
पण.............
तुझा अखेरचा निरोप घेताना
मनात जागी होते खंत नवी
तुझ्या सहवासात घालवलेल्या क्षणांना
मी कधीच विसरू शकत नाही....
म्हणूनच...........
माझ्या त्या स्वप्नाला जपण्यासाठी
तुझ्या सहवासाची जोड हवी.........
- निर्मला........