Author Topic: कुणाची वाट मी पाहतो कशाला  (Read 1282 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
सरलाय गंध
कळतोय मला
विटलाय रंग
दिसतोय मला

प्राणात माझ्या
घट्ट साकळला
जन्म माझा
सलतोय मला

कुणाची वाट मी
पाहतो कशाला
सरलाय दिन
अंधार उशाला

उत्तरे जहाल
हवी काळजाला
श्वास कोळश्याने
परी काजळला
 
येती तमातून
अर्थशून्य कळा
हाय जन्म तुझा
हाही वाया गेला

 विक्रांत प्रभाकर
« Last Edit: November 27, 2014, 10:31:27 PM by MK ADMIN »