Author Topic: तू नाहीस याची जाणीव.............  (Read 2787 times)

Offline nirmala.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 392
 • Gender: Female
 • nirmala.
तू नाहीस याची जाणीव.............
« on: November 14, 2009, 06:25:33 PM »
हे मन आज एकांतात
उगीचच रडत आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.

कधी- कधी ....
तूझं ते माझ्यावर रागावणं,
आणि मी रागावले तर झटक्यात मला मनवणं,
ती एक-एक आठवण, मनाला आज सलत आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.

कधी-कधी ....
तूझं ते मला भेटण्यासाठी बोलावणं,
आणि मी "नाही" म्हणताच, अल्लडपणे हट्ट धरणं,
तूजा तो हट्ट आजही माझ्या स्मरणात आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.

कधी- कधी ....
तूझं ते माझ्यासाठी वाट पाहणं,
मी उशिरा आले कि माझ्यावर ओरडणं,
पण माझ्या एका .....,sorry मुळे
तूझा तो राग "स्मित हास्यात" विरून जाणं,
आजही ते हसू माझ्या आठवणीत आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.

खरंच ...........
हे मन आज एकांतात
उगीचच रडत आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.

- निर्मला.............
   :(
« Last Edit: November 16, 2009, 11:41:04 AM by nirmala. »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: तू नाहीस याची जाणीव.............
« Reply #1 on: November 15, 2009, 04:55:14 PM »
Quote
कधी-कधी .
तूझं ते मला भेटण्यासाठी बोलावणं
आणि मी "नाही" म्हणताच , अल्लड पणे हट्ट धरण
तूजा तो हट्ट आजही माझ्या स्मरणात आहे.
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव चळत आहे
:'(

Fantastic.....   :)

याची जाणीव चळत आहे.  nakki चळत  ki छळत  asa ahe ??


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: तू नाहीस याची जाणीव.............
« Reply #2 on: November 16, 2009, 12:08:43 AM »
छान!!! शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त कर. :)

Offline nirmala.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 392
 • Gender: Female
 • nirmala.
Re: तू नाहीस याची जाणीव.............
« Reply #3 on: November 16, 2009, 11:11:10 AM »
ok my friend..........thanx for ur comment.......... :)