Author Topic: ती आज परत आली  (Read 1462 times)

Offline vaby

  • Newbie
  • *
  • Posts: 3
ती आज परत आली
« on: November 28, 2014, 01:08:07 PM »
ती आज परत आली पण नेहमी सारखी गप्प नव्हती
 काही तरी बोलायचे होते काहीतरी सांगायचे होते,
थोडी घाबरली थोडी बावरली नजर तिची जमिनीकडे होती
ओढणी बरोबर उगाचच खेळ करत बोलायचा इशारा करत होती
 
 
मग मी हि समजलो तिची अस्वस्थता
 मी तरी वेडा काय करणार माझी हि तीच अवस्था
शेवटी धीर करून मी विचारले ''कशी आहेस?...
''आणि इतक्या दिवसांचे बंध अचानक तुटले अचानक,
कुशीत कधी शिरली माझ मलाच कळलं नाही
अश्रूंचा बांध दोन्ही कडून ओसंडून वाहत होता..
 
वर्षभराने आम्ही आज भेटत होतो
 तीन ऋतू आम्ही एकमेकांविना घालवले होते
 आज हा प्रेमाचा दुष्काळ संपला होता
 भूतकाळातल्या चुकांची दुरुस्ती करायची होती
 सगळे सर्व विसरून नव्याने उभे राहायचे होते...
खूप बोललो,खूप गप्पा केल्या, पुन्हा भेटायच्या आणाभाका घेतल्या
 
हे असे रोजचेच आहे आम्ही नेहमी भेटतो
 ती नेहमी माझ्या स्वप्नातच येतेआणि मग माझी माफी मागते
मग मी हि उदार मनाने सर्व विसरून जातो,
 ज्या गोष्टी मी प्रत्यक्षात व्हायच्या त्या आज मी स्वप्नात अनुभवतोय ...
आज मला खंत नाही कि तू मला दूर केलंय याची ?
असेल तर तुलाच कि खंर प्रेम गमावल्याची ....
 
स्वप्नात मला आजही तू रोज भेटतेस
 प्रत्यक्षात तुला भेटायचे नसेल तरी तू मला भेटणार
तुझा तो स्पर्श, तुझे ते निरागस डोळे आजही मी अनुभवतो,पाहतो
 हे असे निरंतर सुरु राहणार हे तर नक्की ..
.जाईन सोडून मी जेव्हा...माझ्या प्रेमाची किंमत तुला कळणार....
BY VAIBHAV RANSING
8454973737
« Last Edit: November 28, 2014, 01:26:19 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Vishal Gosavi

  • Guest
Re: ती आज परत आली
« Reply #1 on: December 07, 2014, 11:50:35 PM »
गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात

खूप आहे माझा तुझ्यावर प्रेम
पण कसा वेगळाच आहे ह्या फीलिंग्स चा गेम

प्रेमाची भाषा मला कधीच नाही कळली
पण मलाच माहीत नाही मी तुझ्या प्रेमात कशी पडली

मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श
पण प्रपोज़ करायला तू लावणार आहेस किती वर्ष???

तुला होकार द्यायला मी कधीची आहे रेडी
पण पायात अडकली आहे करियरची बेडी

हे आपला अबोल प्रेम असाच सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना एकदा तरी खुलू दे