Author Topic: तू ह्रदयावर केलेल्या वाराचे...  (Read 1059 times)

Offline Aishu

  • Newbie
  • *
  • Posts: 32
तू ह्रदयावर केलेल्या वाराचे

सारे खड्डे बुजवून नव्या चैतन्याने पुन्हा,
लखलखीत होऊन नाही जगता येत

तूझ्या आठवणीत असताना,

अचानक हळूवार झालेल्या वा-याच्या स्पर्शाने देखील
आतल्या आत दिलेल्या तू जखमा मात्र त्या
अजून ही सलत रहातात

तू मला टोचलेले ते काटे उपटून मी टाकलेत जरी
त्याचे व्रण मात्र अजुनही मला बोचतात तरी

जीवघेण्या त्या आठवणी आठवतात मला जेव्हा
अंगावर काटाच उभा राहतो माझ्या तेव्हा

एखाद्याच्या मनात करून ठाव
अचानक असा नका करू घाव
                     नका करू घाव.....


AISHWARYA SONAVANE
        MUMBAI