Author Topic: मनुवादाच्या सापान  (Read 559 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
मनुवादाच्या सापान
« on: December 13, 2014, 02:02:57 PM »
56 सालीच माझ्या बापान
खड्यातून बाहेर नेलं
तरीही मनुवादाच्या सापान
पुन्हां मला अस्पृश्य केलं

आजही गावात आमचा बाट
जातिवादाची येथे आजही लाट

आजही आमच्या बहिणीवर होतात बलात्कार
आजही आमच्यावर तेच ते अत्याचार

आजही आमच्यावर होती शब्दाचे वार
शिकून सवरुन ही आमची होते हार

कुठे जाइ आमच्या रक्ताचे सांड
कुठे घडती आमचे हत्याकांड

कुठे आमच्या हत्या कुठे बलात्कार
येणार तरी कोण आता करण्या चमत्कार

सुटता सुटेना ही जातीची वजाबाकी
सोडून दुनियादारी आता तरी करा एकी

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता