का ?
जायचंच होतं आयुष्यांतून निघून तर
आयुष्यांत आलासच का होतास?
माझ्या वेड्या मनात एक वेगळीच
आशा मग तू जागवूनच का गेलास?
स्वंप्न पाहिली होती जी आपण एकत्र
चुरांडा त्यांचा तू असा का केलास?
जन्मभराची साथ माझी तू अशी
अर्ध्या वाटेवरच सोडून का गेलास?
सांग माझा असा काय गुन्हा होता ज्याची
अशी भयंकर शिक्षा तू मला देवून गेलास?
- संतोषी साळस्कर.