Author Topic: पाणी जसे सांडलेले  (Read 743 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
पाणी जसे सांडलेले
« on: December 22, 2014, 08:48:11 PM »
घरदार
सुटलेले
स्वप्न सारे
मिटलेले

पण मन
सुखामागे
हावरट 
लागलेले
 
कुणासाठी
कधीतरी
वेडेपण
पांघरले

अहो जिणे
खोटे नाटे
नाटकच
रंगविले
 
तिला मुळी
पर्वा नाही
तिचे हात
बांधलेले

जगतोय
पथावरी
पाणी जसे
सांडलेले

विक्रांत प्रभाकर
 
« Last Edit: December 26, 2014, 06:42:31 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता