Author Topic: टिंब टिंब म्हणत जीवन ...  (Read 722 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
टिंब टिंब म्हणत जीवन ...
« on: January 19, 2015, 11:34:45 PM »


मी थांबलो असतो
तू म्हटली असतीस थांब जर
पण त्या निरोप समारंभात
निरोपाची फुले होती
तेव्हा तुझ्याही हातात
अन मग
ती दूरवर वाहणारी वाट
रुंद अन प्रशस्त गेली होत
पाय अडखळलेच नाही
असे कसे म्हणू मी
प्रत्येक वळणार
तुझी याद येत होती
प्रत्येक रात्री
तुझीच स्वप्न दिसत होती   
हे खर आहे की
जीवन अडत नाही कधी
कुणाच्या असण्या नसण्यानं
पण ते तुझे ठरवून नसणे
एखाद्या रिकाम्या जागे सारखे
खटकत राहते अन
टिंब टिंब म्हणत जीवन
पुढे सरकत राहते
उत्तर माहित असूनही

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: January 20, 2015, 09:51:57 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता