Author Topic: तुझ्या माझ्या प्रेमाचा शेवट का झाला ?  (Read 2550 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
सुखाचा गोड धागा
कडवट का झाला
तुझ्या माझ्या प्रेमाचा
शेवट का झाला ! !


आपुलकीच्या नात्यात
कमी कोण पडले
दोघांच्या प्रेमात
तिसऱ्याचे काय अड़ले
सात जन्माच्या सोबतीचा
एकाच जन्मी अंत का झाला
तुझ्या माझ्या प्रेमाचा
शेवट का झाला ! !


दुसऱ्याच्या सांगण्यावरून
मज दिले तू सोडून
होती तुझी अर्धांगनी
अर्ध्यातच सोडिले डाव मोडून
खंबीरपणे उभा राहणारा तू
असा अर्धवट का झाला !
तुझ्या माझ्या प्रेमाचा
शेवट का झाला ! !


नाही मोडिलें मी
तुझ्या इभ्रतीचे तत्व
दिले आहे तुलाच
मी माझे सर्वत्व
गात होता प्रेमाचा गोडवा
आता तुला वीट का आला !
तुझ्या माझ्या प्रेमाचा
शेवट का झाला ! !


लावीले तुझेच कुंकू
जपून पत्नीचे सूत्र
घातले मी गळ्यात
तुझ्याच नावाचे मंगळसूत्र
होता आधी प्रेम वेडा
आता जळफळाट का झाला
तुझ्या माझ्या प्रेमाचा
शेवट का झाला ! !


संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता


प्रमोदिनी

  • Guest
"दिले आहे तुलाच
मी माझे सर्वत्व
गात होतास प्रेमाचा गोडवा
आता तुला वीट का आला?"
बेअकली तो असे उघड
सह्याद्रीतला एक दगड

अगे, मान देवाचे आभार
उतरवला त्याने गळ्यातून तव
आयुष्यभरचा दगडाचा भार


Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
कुंकवाला कलंक लागला
दगड मात्र हसू लागला

अंग झटकून आनंदात
बाशिंग बांधायला तयार  होऊ लागला

Devendra kanfade

  • Guest
"दिले आहे तुलाच
मी माझे सर्वत्व
गात होतास प्रेमाचा गोडवा
आता तुला वीट का आला?"
बेअकली तो असे उघड
सह्याद्रीतला एक दगड

अगे, मान देवाचे आभार
उतरवला त्याने गळ्यातून तव
आयुष्यभरचा दगडाचा भार