Author Topic: अग्निबंध  (Read 536 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
अग्निबंध
« on: January 23, 2015, 07:11:12 PM »
आज उदास उदास
नाही कशात उल्हास
तुझी आठवण अशी
छळते गं हमखास !

मन सैरभैर दूर
तुझ्या वस्तीला राखण
मी असा चलबिचल
नाही रुचत जेवण !

काय करु,कसं करु
जीवा सारखाच घोर
जसा झुरतो झुरतो
चांदण्याविन चकोर !

गाते कोकीळा विरह
माझे भरतात डोळे
ये ना गं तू संगतीला
बघ ह्रदयाचे उमाळे !

तू आहे तरच सारे
नाहीतर नाही गंध
गुलाबाच्या साक्षीनेच
आता बांधू अग्निबंध !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता