Author Topic: आता...  (Read 678 times)

Offline गणेश म. तायडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 195
  • Gender: Male
  • ॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥
    • ganesh.tayade
आता...
« on: January 24, 2015, 03:43:04 PM »
खूप सहज झाले,
तुजसाठी विसरणे आता...
जुने झाले प्रेम,
तुला नाही आठवत आता...
उडाले छप्पर,
माझ्या प्रेमाचे आता...
राहिल्या पडक्या भिंती,
तुझ्या आठवणींच्या आता...
कुठं हरवल्या त्या,
तुझ्या गप्पा आता...
कुठं हरवल्या त्या,
तुझ्या मस्त्या आता...
कळत नकळत सारे,
हरवले रस्ते आता...
असते सर्व काही,
फक्त तुच नसते आता...
तुझ्या प्रेमात अख्खे,
विश्व रंगले होते आता...
होईल पुर्ववत सारे,
या आशेवर जगत आहे आता...
तु माझी होशील की नाही,
या चिंतेत मरत आहे आता...

- गणेश म. तायडे
   खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता